निवडणुकीचा हँगओव्हर,बाबूंसाठी रंगली ‘जंगल पार्टी’

April 7, 2014 4:10 PM0 commentsViews: 935

latur_officer_party07 एप्रिल : लोकसभा निडवणुकीच्या धामधुमीतून बाहेर पडण्यासाठी लातूरमध्ये सरकारी अधिकार्‍यासाठी चक्क ‘जंगल पार्टी’चं आयोजन करण्यात आलायचं समोर आलंय. लातूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाले कर्मचारी आणि अधिकारी यांचं वनविभागाच्या रेस्टहाऊसमध्ये वनभोजन झालं.

यामध्ये जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसह जवळपास 200 अधिकारी-कर्मचारी या वनभोजनात सहभागी झाले होते. अधिकार्‍यांसाठी लज्जदार, पंचपकवानाची सोय करण्यात आली होती. एवढेच नाही तर भव्य असा बुफेही लावण्यात आला होता.

भरात भर म्हणजे अधिकार्‍यांच्या स्वागतासाठी आणि वेटर्स म्हणून तरुण-तरुणींना बोलावण्यात आलं होतं. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणुकीच्या यंत्रणेचा खर्च केला जातो. त्यामुळे वनविभागानं कोणत्या निकषावर इथं परवानगी दिली होती, यासाठी कोणी पैसा खर्च केला, ही मेजवानी कोणी आयोेजित केली होती असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र या घटनेचा आम आदमी पार्टी आणि बसपाने निषेध केला असून अधिकार्‍यांच्या चौकशीची मागणी केली आहे. त्याबरोबर अशा अधिकार्‍यांच्या नियंत्रणात लातूरची लोकसभा निवडणूक पारदर्शक होईल का ? असा सवाल आपने उपस्थित केलाय.

close