सुंदर हत्तीला अभयारण्यात सोडा, कोर्टाचे आदेश

April 7, 2014 3:55 PM0 commentsViews: 797

342sunder_elephant_news_kolhapur07 एप्रिल : अखेर सुंदर हत्तीची ज्योतिबा देवस्थानातून सुटका होणार आहे. सुंदर हत्तीला अभयारण्यात सोडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे. सुंदर हत्तीचं वास्तव्य ज्योतिबा डोंगरावर होतं. पण देवस्थान समितीला त्याचं पालनपोषण करता आलं नाही.

त्यामुळे आमदार विनय कोरे यांनी त्याचा काही वर्षं सांभाळ केला. त्यादरम्यान सुंदर हत्तीचा छळ होत असल्याची तक्रार झाली. पेटा या वन्यजीव संस्थेनं याबद्दल हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने सुंदरला अभयारण्यात सोडण्याचे आदेश दिले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्योतिबा देवस्थानच्या सुंदर हत्ती गेल्या सहा वर्षांपासून यातना भोगत आहे. आमदार विनय कोरे यांनी सुंदर हत्तीला ज्योतिबाला भेट दिला होता. 2013 मध्ये सुंदर हत्तीला माहुताने मारहाण केल्याचा प्रकार ‘पेटा’ने उघड केला होता. तसंच हत्तीची देखभाल नीट केली जात नसल्याचंही समोर आलं होतं. पेटाने हा विषय उचलून धरला होता.

या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलही घेतली गेली. ब्रिटनचे संगीतकार पॉल मॅककार्टेनी आणि मॅडोना यांनी याचा निषेध केला होता. त्यानंतर कोरे यांनी हा हत्ती वारणेत हलवला होता. पेटाने सुंदरच्या मुक्तीसाठी ऑनलाइन पिटीशन दाखल केली होती. याला मोठ्याप्रमाणात पाठिंबा मिळाला होता. या हत्तीला मुक्त करण्याचे आदेश वनमंत्री पतंगराव कदम यांनीही दिले होते तरीही सुंदरची मुक्तता करण्यात आली नाही.

सुंदर हत्तीला वाचवण्यासाठी अनेक हॉलिवूडची अभिनेत्री पामेला अंडरसन सह बॉलिवूडमधली अनेक दिग्गज कलावंत त्याला वाचवण्याच्या मोहिमेत सहभागी झाले होते. जानेवारी महिन्यात अभिनेत्री माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी या हत्तीला ‘पेटा’ या वन्यजीव संस्थेकडे सोपवावं, असं पत्र आमदार विनय कोरे यांना लिहिलं होतं. पण यावर काही तोडगा निघाला नसल्यामुळे हा वाद मुंबई हायकोर्टात गेला.अखेर कोर्टाने दखल घेत सुंदरची मुक्तता करण्याचे आदेश दिले आहे.

close