शिट्टी ‘बजाके’

April 7, 2014 7:20 PM0 commentsViews: 1703

07 एप्रिल : माढ्याचे महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या प्रचारासाठी रविवारी माळशिरसमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. नेहमी सभेचा प्रतिसाद मोजला जातो तो लोकांच्या टाळ्यांच्या माध्यमातून..पण या सभेत गजर होता तो शिट्‌ट्यांचा. त्याचं कारण म्हणजे सदाभाऊंचं निवडणूक चिन्ह आहे शिट्टी..त्यामुळे सभेत येणाया सर्व तरूणांना शिट्यांचं वाटप करण्यात आलं होतं. त्यामुळे संपूर्ण सभेदरम्यान शिट्टयांचा हा गजरच लक्षवेधी ठरला.

close