मोदींमुळे अडवाणी बाजूला पडले-राहुल गांधी

April 7, 2014 7:58 PM1 commentViews: 528

07 एप्रिल : एकेकाळी मोठे नेते असलेले भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी आता मोठे राहिले नाहीत, मोदींमुळे ते भाजपमध्ये बाजूला पडले आहेत अशी बोचरी टीका राहुल गांधींनी केलीय. आज कर्नाटकमधल्या बेंगळुरूमध्ये आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अडवाणी नाराज झाले होते. अडवाणींचं नाराजी नाट्य इथंच संपलं नाही तर अलीकडे भोपाळ ऐवजी गांधीनगरमधून उमेदवारी दिल्यामुळे अडवाणी पुन्हा नाराज झाले होते. अडवाणींच्या कोंडीवर बोट ठेवत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधलाय.

  • sagar hule

    tu chup bas yeda lavda aahe tu

close