आसाममध्ये 72 तर त्रिपुरात 84 टक्के विक्रमी मतदान

April 7, 2014 8:18 PM0 commentsViews: 755

mizoram-mnf-and-mpc-reach-poll-agreement-for-assembly-elections_18101308293107 एप्रिल : सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज (सोमवारी) ईशान्येकडच्या आसाम आणि त्रिपुरामध्ये झालं. दोन्ही राज्यांमध्ये मतदारांनी भरघोस मतदान केलं.

आसाममध्ये 72 टक्के तर त्रिपुरामध्ये 84 टक्के मतदान झालं. आसाममध्ये पहिल्या टप्प्यात 51 उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा मुलगा गौरव गोगोई कालियाबोरमधून पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

आसाममधल्या 33 ईव्हीएममध्ये बिघाड झाला. त्यातल्या 29 ईव्हीएम बदल्यण्यात आल्या. 8 हजार मतदान केंद्रांवर 235 सुरक्षा दलं तैनात करण्यात आली होती. त्रिपुरामध्ये एका मतदारसंघासाठी मतदान झालं. त्यासाठी 15 उमेदवार रिंगणात आहेत.

close