औरंगाबादेत तलावात बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

April 7, 2014 8:29 PM0 commentsViews: 444

09_aurangabad_news07 एप्रिल : औरंगाबाद येथील हर्सुल तलावात बुडून चार विद्यार्थ्यांचा दुदैर्वी मृत्यू झाला. दहावीच्या परिक्षा संपल्यानं शहरातील सहा युवक हर्सुल तलावात पोहण्यासाठी गेले होते.

चार युवक पोहतांना तलावात बुडाले. घाबरलेले दोन युवकांनी तलावाजवळून पळ काढला आणि त्यांनी घरातील व्यक्तींना ही घटना सांगितली.

तोपर्यंत बराच वेळ निघून गेल्यानं बुडालेल्या चौघांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन जणांचे मृतदेह शोधून काढले..मात्र उशिरा पर्यंत चौथा मृतदेह सापडला नव्हता.

close