रामदास आठवलेंची आता काँग्रेसशी जवळीक

March 26, 2009 9:16 AM0 commentsViews: 4

26 मार्चरामदास आठवलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून काँग्रेसची वाट धरली आहे. काँग्रेसच्या कोट्यातून जागा मिळणार असल्यामुळं आठवले यांनी आनंदाच्या भरात मनमोहनसिंग यांना पंतप्रधान पदासाठी पांठिंबा दिला. दरम्यान, रामदास आठवलेंनी गुरुवारी सोनिया गांधींची भेट घेऊन आपला यापुढचा प्रवास काँग्रेसबरोबर असेल, असं सांगितलं. या मोबदल्यात त्यांच्यासाठी एक जागा काँग्रेस सोडणार आहे. मात्र त्यांना हवी असलेली शिर्डीची जागा द्यायची का यावर अजून निर्णय झालेला नाही. पण लवकरच आठ जागांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

close