‘महिलांच्या हाती प्रचार द्या’

April 7, 2014 10:01 PM0 commentsViews: 576

07 एप्रिल : कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंचा एक महिला मेळावा झाला. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी कागलमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुळेंनी महिलांना एक अनोखा मंत्र दिला. महिलांच्या हाती प्रचाराची सूत्र द्या असा अगदी स्वस्त मंत्र आपल्याला गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सांगितल्याचंही सुळेंनी सांगितलंय. मात्र त्यावर महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी टीका केलीय.

close