सचिनने केली युवराजची पाठराखण

April 7, 2014 10:36 PM0 commentsViews: 2622

45_sachin_yuvi07 एप्रिल : टी-20 वर्ल्डकपमध्ये श्रीलंका सोबत झालेल्या फायनलमधल्या खराब कामगिरीनंतर युवराज सिंगवर टीका होतेय. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने युवीची पाठराखण केली आहे.

‘युवराजने 2007 आणि 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली आहे. फक्त एका वाईट दिवसावरून त्याची निंदा करणं आणि त्याला दूषणं देणं बरोबर नाही’ असं सचिनने त्याच्या फेसबुक पेजवर म्हटलंय. दरम्यान, रविवारच्या मॅचमध्ये युवराजने 21 बॉल्समध्ये फक्त 11 रन्स केल्या होत्या. भारत मॅच हरल्यानंतर युवराजच्या घरावर दगडफेकसुद्धा झाली होती. युवीला बॉलिवूडच्या कलाकारांनीही पाठराखण केली.

रविवारी झालेल्या फायनल मॅचमध्ये भारताचा 6 विकेटनं दणदणीत पराभव करत लंकेनं टी 20 वर्ल्ड कपचे चॅम्पियन होण्याचा मान पटकावलाय.विराट कोहलीच्या तुफानी 77 रन्सच्या जोरावर भारतानं लंकेसमोर विजयासाठी 131 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण विजयाचं हे सोपं आव्हान लंकेनं 6 विकेट राखून पार केलं. 2009 आणि 2012 ला फायनलपर्यंत पोहोचलेल्या लंकेला वर्ल्ड कप विजयावर नाव कोरता आलं नव्हतं. पण ती खंत आज त्यांनी भरून काढली. तर धोणीच्या यंग ब्रिगेडचं दुसर्‍यांदा टी 20 वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न मात्र भंग पावलंय.

close