विदर्भाच्या आखाड्यात बाजी कोण मारणार ?

April 7, 2014 10:52 PM0 commentsViews: 2364

gadkari vs aap07 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी येत्या दहा एप्रिलला विदर्भातल्या दहा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. त्यानिमित्तानं विदर्भातल्या प्रमुख लढतीचा हा आढावा…भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. त्यामुळे नागपूरची लढत प्रतिष्ठेची बनलीय.

आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी गडकरींचा खरा सामना असेल तो काँग्रेसचे सलग चार टर्म खासदार असलेले विलास मुत्तेमवार यांच्याशी. भाजपची मजबूत पक्षसंघटना असली तरीही गडकरींसाठी विजयाचा मार्ग सोपा नाही.

27 टक्के दलित मतं आणि 11 टक्के मुस्लीम मतं अशी एकूण 38 टक्के मतं नागपूरमध्ये निर्णायक ठरणार आहे. त्यामुळेच विलास मुत्तेमवार यांनी पदयात्रा काढून घरोघरी पोचण्याचा प्रयत्न चालवलाय. तर नितीन गडकरींनी विकासाचा अजेंडा घेऊन रोड शो करण्यावर भर दिलाय.

 लढाई नागपूरची
: विलास मुत्तेमवार

बलस्थानं

 • - सलग 4 वेळा खासदार
 • - निवडणुकीत जिंकण्याचा अनुभव
 • - दांडगा जनसंपर्क
 • - हायकमांडचे विश्वासू
 • - धर्मनिरपेक्ष चेहरा

उणिवा

 • - जातीचं पाठबळ नाही
 • - विकासकामांमध्ये कमी पडले
 • - काँग्रेसमध्ये गट-तट
 • - मोदी लाटेचा फटका बसण्याची शक्यता

नितीन गडकरी
बलस्थानं

 • - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पाठबळ
 • - संघाचे उमेदवार अशी प्रतिमा
 • - विकासावर भर
 • - मॅनेज करण्याची कला अवगत
 • - सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध
 • - वक्तृत्वाची हातोटी

उणिवा

 • - प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव नाही
 • - पक्षांतर्गत विरोध
 • - प्रचारात कमी
 • - ज्येष्ठ भाजप नेत्यांची अनुपस्थिती
 • - नरेंद्र मोदींची एकही सभा नाही
 • - सर्वसमावेशक प्रतिमा नाही

 अंजली दमानिया
बलस्थानं

 • - धडाडीच्या कार्यकर्त्या
 • - भ्रष्टाचारविरोधी लढा

उणिवा

 • - आयात उमेदवारी
 • - निवडणुकीचा अनुभव नाही
 • - एकसुरी प्रचार
 • - जनसंपर्क नाही
 • - पक्ष संघटनेचं जाळं नाही
 • - कार्यकर्त्यांची फौज नाही

 X फॅक्टर
- विकासाचा अजेंडा घेऊन निवडणूक होत असली तरी 27 टक्के दलित आणि 18 टक्के मुस्लीम मतं निर्णायक ठरणार.
- अटीतटीच्या लढतीत निकाल वर्तवणं कठीण

प्रफुल्ल पटेल विरुद्ध नाना पटोले

 पण, या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल निवडणूक लढवत आहेत. त्यांचा थेट सामना आहे तो भाजपचे नाना पटोले यांच्याशी ही लढत जरी तुल्यबळ वाटत असली तरी विकासकामांच्या जोरावर प्रफुल्ल पटेल यांचं पारडं जड मानलं जातंय. पण, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तेली-कुणबी मतांची मोट बांधून बाजी उलटवण्याचा प्रयत्न महायुतीकडून होतोय.

- प्रफुल्ल पटेल
बलस्थानं

 • - केंद्रीय मंत्रीपदाचा फायदा
 • - आर्थिकदृष्ट्या सक्षम
 • - विकासकामांची मोठी यादी
 • - सिंचन प्रकल्प मार्गी
 • - पक्ष संघटनेवर पकड
 • - गटबाजी मोडून काढली

उणिवा

 • - मतदारसंघाशी नाळ जुळलेली नाही
 • - बिगर मराठी आणि धंदेवाईक व्यक्तिमत्व
 • - भूमीपुत्र नसल्याची टीका
 • - कुणबी समाज विरोधात

नाना पटोले
बलस्थानं

 • - भूमिपुत्र अशी प्रतिमा
 • - स्थानिक प्रश्नांची उत्तम जाण
 • - उत्तम वक्तृत्त्व
 • - जातीपातीच्या राजकारणात नाही
 • - कुणबी मतांची साथ

उणिवा

 • - दिल्लीतल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क नाही
 • - भाजप आमदारांची साथ नाही
 • - प्रचारासाठी मोदी फिरकले नाही
 • - आर्थिकदृष्ट्या कमकुवत

X फॅक्टर : बसपा
बसपाचे संजय नासरे, आम आदमी पक्षाचे प्रशांत मिश्रा आणि मोरेश्वर मेश्रामसारखे अपक्ष उमेदवार मतांचं गणित बिघडवू शकतात. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांचं पारड जड आहे.

रामटेकमध्ये तिरंगी लढत

रामटेक या राखीव मतदारसंघात तिरंगी लढत होतेय. तिरंगी लढत होत असली तरी खरी लढत ही काँग्रेसचे मुकुल वासनिक आणि शिवसेनेचे कृपाल तुमाणे यांच्यात होतेय. विद्यमान खासदार म्हणून मुकुल वासनिक यांची कामगिरी फारशी समाधानकारक नसली तरी आघाडी प्रचार यंत्रणा त्यांच्या कामात आलीय. तर दुसरीकडे कृपाल तुमाणे यांना रसद पुरवण्यात शिवसेना कमी पडल्याचं स्पष्ट जाणवतंय. या मतदारसंघात उमेदवारांची भिस्त कुणबी मतांबरोबरच दलित मतांवरसुद्धा आहे. त्यामुळेच तिसरे उमेदवार बसपाच्या किरण पाटणकर यांना किती मतं जातात, यावर इथल्या लढतीचं भवितव्य अवलंबून आहे.

मुकुल वासनिक
बलस्थानं

 • - दिल्ली दरबारातले नेते
 • - पक्ष संघटनेवर पकड
 • - गटबाजी नाही
 • - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी पॅकेज आणलं

उणिवा

 • - मतदारसंघाकडे दुर्लक्ष
 • - इतर भरीव काम नाही
 • - विकासकामं फारशी नाही

कृपाल तुमाणे
बलस्थानं

 • - सर्वसामान्यांशी दांडगा संपर्क
 • - भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते पाठीशी
 • - जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात
 • - स्वच्छ प्रतिमेचे कार्यकर्ते

उणिवा

 • - शिवसेनेची पक्षसंघटना कमजोर
 • - केवळ भाजपवरच अवलंबून
 • - आर्थिकदृष्ट्या कमकुवत

 X फॅक्टर : बसपा
- बसपाचे उमेदवार प्रकाश टेंभुर्णे यांनी गेल्या वेळी 62 हजार मतं खेचली होती.
- बसपाने दलित गायिका किरण पाटणकर यांच्या रुपात एक भक्कम उमेदवार दिलाय.
- त्या किती मतं मिळवतात यावर या लढतीचं भवितव्य आहे.
 

close