युपीएमध्ये गटबाजी : लालू, मुलायम आणि पासवान एकत्र

March 26, 2009 11:39 AM0 commentsViews: 1

25 मार्चकाँग्रेसला धुडकावून लालू, पासवान आणि मुलायमसिंग एकत्र आलेत. आतापर्यंत यूपीएचे घटक असलेल्या लालू आणि पासवान यांनी बिहार साठी वेगळा घरोबा केला. काँग्रेसला बाजूला केलं. आता या दोघांना मुलायमसिंग येऊन मिळालेत. उत्तरप्रदेशच्या 80 तर बिहारच्या 40 अशा सुमारे 120 लोकसभेच्या जागेसाठी हे तीन नेते एकत्र आलेत. या पक्षांसोबत काँग्रेसची जागावाटपाची बोलणी फिसकटली. त्यानंतर काँग्रेसनं स्वबळावर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं हे नेते एकत्र आलेत. 30 मार्चला या आघाडीची घोषणा होईल. लालूप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल पक्षाकडे यादव आणि मुस्लीमांच्या मतांचा आधार आहे. तर स्वत: पासी या ताडी विकणार्‍या जातीतून आलेल्या रामविलास पासवानांकडे दलितांची मतं आहेत. मुलायमसिंग यांचीही भिस्त उत्तरप्रदेशात यादव आणि मुस्लीम मतांवर आहे. मध्यम आणि दलित जाती तसंच मुस्लीम यांची एकगठ्ठा मतं मिळण्याची आशा लालू- पासवान आणि मुलायम यांना आहे.

close