जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाची आज मुंबई हायकोर्टात अंतिम सुनावणी

April 8, 2014 10:44 AM0 commentsViews: 275

Image img_181732_pune-german-bakery-blast_240x180.jpg08 एप्रिल :  2010मध्ये पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाची अंतिम सुनावणी आज मुंबई हायकोर्टात होणार आहे. या प्रकरणी पुणे सेशन्स कोर्टानं या खटल्यातला एकमेव दोषी हिमायत बेग याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याविरोधात त्यानं हायकोर्टात याचिका दाखल केलीये, त्यावरही आज सुनावणी होणार आहे.

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि इंडियन मुजाहिद्दीनचा मोठा दहशतवादी हिमायत बेग याला दोषी ठरवण्यात आलं असून त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यांत 5 वेळा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे ही शिक्षा कायम व्हावी यासाठी पोलिसांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तर हिमायत बेगच्या वतीनं फाशीच्या शिक्षेला आव्हान देण्यात आलं आहे. या दोन्ही याचिकांवर मुंबई हायकोर्टात गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. या याचिकांवर आज मुंबई हायकोर्ट अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12 ते 12.30च्या सुमारास अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.

close