…नाहीतर प.बंगालमध्ये ‘लोकसभा’ रद्द करू,आयोगाचा ममतांना इशारा

April 8, 2014 12:13 PM0 commentsViews: 1047

Image img_178262_mamata_240x180.jpg08 एप्रिल :  पश्चिम बंगालमध्ये अधिकार्‍यांच्या बदली करण्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि निवडणूक आयोगादरम्यान संघर्ष उद्भवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांनी केलेल्या तक्रारीनंतर आयोगाने 5 पोलीस अधीक्षक आणि 1 जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. बॅनर्जी यांनी आयोगाच्या आदेशाचे पालन न केल्यास राज्यातील निवडणुका रद्द करण्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मात्र, याला पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार आक्षेप घेत आपण सत्तेत असताना आयोगाने या अधिकार्‍यांची बदली करून दाखवा, असं उलट आव्हान निवडणूक आयोगाला त्यांनी दिलं आहे.  ममता बॅनर्जी यांनी थेट निवडणूक आयोगाचे आदेश झुगारल्याने भारतीय राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेत आज अडीचपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्याचं बरोबर आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुकांवरही भीतीचे सावट आहे.

दरम्यान याबाबत कालच्या एका रॅलीत ममता बॅनर्जी यांनी ‘मी निवडणूक आयोगाचा आदर करते. पण मी झुकणार नाही. मला आयोगाला विचारायचंय की तुम्ही फक्त काँग्रेस भाजपच्याच ऐकणार का? मी हे म्हणाल्याने ते मला काय करतील? मला अटक होईल आणि मी जेलमध्ये जाईन ना? असं त्या म्हणाल्या.

close