‘त्या’ खलाशांना अजून शिक्षा का झाली नाही – मोदी

April 8, 2014 1:42 PM0 commentsViews: 660

modi_rally_himachal_360x270_4408 एप्रिल : केरळमधल्या मच्छिमारांची इटालियन नौसैनिकांनी केलेल्या हत्येचा मुद्दा उपस्थित करत ‘इटालियन खलाशांनी केरळच्या मच्छीमारांची हत्या केली, त्या खलाशांना अजून शिक्षा का झाली नाही असा प्रश्न भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी विचारला. याबाबत पंतप्रधान असोत, केरळचे मुख्यमंत्री किंवा संरक्षणमंत्री कोणीही माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यावं असेही ते म्हणाले. केरळमधील कासारगोड येथील सभेत ते बोलत होते. यावेळी नौदलात घडणार्‍या अपघातांच्या मुद्द्यांवरून त्यांनी संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांच्यावरही टीका केली.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळचे दहशतवादाच्या नंदनवनात रुपांतर होत आहे अशा शब्दांत मोदी यांनी केरळ सरकारवर टीकास्त्र सोडले. केरळमध्ये शांतता नांदत होती मात्र युडीफ-एलडीफमुळे राज्यात दहशतवाद वाढीस लागला आहे, असेही ते म्हणाले.

त्याचं बरोबर केरळमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे सांगत महिलांवरील गुन्हेगारीच्या बाबतीत यूपीए सरकारचीच राज्ये अग्रेसर आहेत असेही ते म्हणाले.

close