खादीची चलती

April 8, 2014 3:16 PM0 commentsViews: 436

08 एप्रिल :  आपल्या देशात राजकारणी म्हटलं तर डोळ्या समोर येतात ते खादीचे कपडे आणि गांधी टोपी घातलेलं व्यक्तिमत्व. स्वातंत्र्याच्या काळापासूनच खादी ही राजकिय नेत्यांची ओळख बनलीय.मात्र गेल्या काही वर्षांत खादीचा वापर आउट डेटेड फॅशन म्हणून थोडासा कमी झालेला.

पण सध्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान सर्वच राजकिय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते खादी कपड्यांचा वापर करताना दिसताहेत. आणि यामुळेच खादी कपड्यांच्या व्यापारात चक्क 40 ते 50% वाढ झालीय. सामान्य लोकही सध्या खादी कपड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसताहेत.

close