आचारसंहिताचा भंग : नारायण राणेंच्या विरोधात तक्रार

March 26, 2009 3:17 PM0 commentsViews: 3

26 मार्च नारायण राणेंच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे परशुराम उपरकरांनी केली आहे. कळणी खाण उद्योग बंद करू असं वक्तव्य राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी 24 मार्च रोजी कुडाळमध्ये भरलेल्या काँग्रेसच्या मेळाव्या केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य आचारसंहितेचा भंग करणार आहे. तशी तक्रार शिवसेनेचे आमदार परशुराम उपरकर यांनी सिंधुदूर्ग आणि राज्याच्या निवडणूक अधिका-यांकडे केली आहे. दोडामार्ग इथल्या कळणी खाण उद्योगाला स्थानिकांचा विरोध आहे. 19 मार्च रोजी स्थानिकांनी केलेल्या आंदोलनात खाण उद्योगाच्या सुरक्षारक्षकांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर 20 मार्च रोजी एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यूही झाला होता. सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा केली असता, उपरकरांनी पाठवलेले टपाल मिळालं असून याप्रकरणाची नीट रितसर चौकशी करूनच पुढची कारवाई करण्यात येईल. " जेव्हा नारायण राणे सत्तेवर नव्हते तेव्हा त्यांनी कळणे खाण प्रकरणाला पाठिंबा दिला होता. पण आता जशा निवडणुका जवळ येतायत तसं त्यांनी कळणे खाण प्रकल्पाला विरोध केला आहे. नारायण राणे यांची ही खेळी मतांच्या राजकारणासाठीच आहे, अशी प्रतिक्रिया परशुराम उपरकरांनी दिली आहे. "

close