राष्ट्रवादीच्या प्रचार गाडीच्या धडकेनं चिमुरडीचा मृत्यू

April 8, 2014 4:24 PM1 commentViews: 4091

barshi_accident08 एप्रिल : बार्शी तालुक्यात पानगाव इथं राष्ट्रवादीच्या प्रचार गाडीने एका पाच वर्षाच्या चिमुरडीला उडवलंय. प्रचार गाडीने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत 5 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय.

तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या अपघातानंतर संतप्त गावकर्‍यांनी प्रचार गाडीची तोडफोड केलीय. डॉ. पद्मसिंह पाटील यांचा प्रचारासाठी ही गाडी असल्याचं कळतंय.

धक्कादायक म्हणजे या प्रचार करणार्‍या गाडीत दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. त्यामुळे या घटनेनंतर संतप्त गावकर्‍यांनी प्रचार गाडीची तोडफोड केलीय.

  • Vijay

    congres /ncp hatao desh bachao….

close