साईंच्या चरणी सोन्याचं ताट

April 8, 2014 11:12 PM0 commentsViews: 716

08 एप्रिल : रामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी साईबाबांच्या नगरी शिर्डीत लाखो भाविकांनी गर्दी केलीय. तीन लाख भाविकांनी आज (मंगळवारी)साई समाधीच दर्शन घेतलं. रामनवमीच्या निमित्तानं दोन भाविकांनी साईबाबांना तब्बल एक कोटी 11 लाख रूपयांच्या वस्तू दान स्वरुपात दिल्या आहेत. एका अज्ञात भाविकांनी 90 लाख रूपये किंमतीचे तीन किलो वजनाचे सोन्याचे दोन ताट तर एका भाविकानं 25 किलो वजनाचे तीन चौरंग बाबांना दान स्वरूप दिले आहेत. ज्याचं मुल्य 21 लाख रूपये इतकं आहे. दिवसेंदिवस साईबाबाच्या गंगाजळीत सातत्यानं वाढतयंय. आज रामनवमीचा मुख्य दिवस असल्यानं रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे.

close