मिशन 543 : दिल्लीची लढाई कोण जिंकणार ?

April 9, 2014 9:29 AM0 commentsViews: 736

mission 54309 एप्रिल :  दिल्ली शहरातील पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे. इथून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांचा मुलगा आणि सध्याचा खासदार संदीप दीक्षित निवडणूक लढवतोय. आम आदमी पक्षाने इथून प्रख्यात लेखक राजमोहन गांधी यांना मैदानात उतरवलंय. तर, भाजपाने महेश गिरी नावाच्या संघटनेतल्या एका कार्यकर्त्याला इथं संधी दिलीय.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल तीनदा मुख्यमंत्री राहीलेल्या शीला दीक्षित यांना अरविंद केजरीवाल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळेच दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित याचं लोकसभेच्या आखाड्यात काय होणार, याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे.

पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात दिल्ली विधानसभेचे एकूण 10 मतदारसंघ येतात. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत 10 पैकी 5 ठिकाणी आपचा विजय झाला होता तर एका ठिकाणी आप दुसर्‍या क्रमाकांवर राहीली होती. भाजपा तीन ठिकाणी जिंकली तर चार ठिकाणी दुसर्‍या क्रमांकावर राहीली. तर काँग्रेस पक्ष 2 ठिकाणी जिंकला आणि पाच ठिकाणी दुसर्‍या क्रमांकावर राहीला.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत इथे संदीप दीक्षित यांना 5 लाख 18 हजार इतकी मतं मिळाली होती. तर तेव्हा दुसर्‍या क्रमांकावर राहिलेल्या क्रिकेटर चेतन चौहान यांना 2 लाख 76 हजार 948 इतकी मतं मिळाली होती.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने या भागात चांगली मजल मारली होती. यावेळीही ती आघाडी कायम राहील का? की आपविरोधी प्रचाराचा फायदा भाजपला मिळणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पूर्वदिल्लीचा मतदार 16 मे रोजी देईल.
 
 मिशन 543 : 2009 विधानसभा निवडणूक : पूर्व दिल्ली मतदारसंघ

  • 10 विधानसभा मतदारसंघांचा समावेश
  • आप : 5 जागी विजय, एका जागी दुसर्‍या क्रमांकावर
  • भाजप : 3 जागी विजय, 4 जागी दुसर्‍या क्रमांकावर
  • काँग्रेस : 2 जागी विजय, 5 जागी दुसर्‍या क्रमांकावर

 मिशन 543 : 2009 लोकसभा निवडणूक : पूर्व दिल्ली मतदारसंघ

  • संदीप दीक्षित, काँग्रेस : 5 लाख 18 हजार मतं
  • चेतन चौहान, भाजप : 2 लाख 76 हजार 948 मतं

 

close