लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यासाठीचं मतदान शांततेत सुरू

April 9, 2014 10:23 AM0 commentsViews: 137

mizoram voting09 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात ईशान्य भारतातल्या 4 राज्यांमध्ये 6 जागांसाठी मतदान सुरू आहे. त्यासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक मतदान केंद्रं दुर्गम ठिकाणी आहेत, मणिपूरमधल्या 2 जागांपैकी आउटर मणिपूर या जागेसाठी मतदान होतं आहे, त्यासाठी 10 उमेदवार उभे आहेत.

दुसर्‍या जागेसाठी 17 एप्रिलला मतदान होणार आहे. नागालँडमध्ये लोकसभेच्या एकमेव जागेसाठी मतदान सुरू आहे. मुख्यमंत्री नेईफियू रियो हे लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. मतदान प्रक्रियेचं वेबकास्टवर प्रसारण केलं जातं आहे. मेघालयात तुरा आणि शिलाँग या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान सुरू आहे.

या निवडणुकीत लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमा आणि त्यांची मुलगी अगाथा संगमा यांचं राजकीय भवितव्य पणाला लागलं आहे. अरुणाचल प्रदेशात लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान सुरू आहे. अरुणाचल प्रदेशात लोकसभेच्या 2 जागांवर तर विधानसभेच्या 60 पैकी 49 जागांवर मतदान सुरू आहे.

close