सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या 400 पदाधिकार्‍यांनी दिले राजीनामे

April 9, 2014 3:20 PM1 commentViews: 4190

Image img_182812_rane34_240x180.jpg09 एप्रिल :   ऐन निवडणुकींच्या तोंडवर नारायण राणे आणि राष्ट्रवादीमधला वाद आता चांगलाच चिघळला आहे. राष्ट्रवादीच्या 400 पदाधिकार्‍यांनी आज आपले राजीनामे दिले. जिल्हाध्यक्ष बाळा भीसे यांच्याकडे हे राजिनामे सोपवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कालच नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत विश्वास व्यक्त केला होता.

वरिष्ठांचा दबाव आला तर हे राजीनामे प्रदेशाध्यक्षांना देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. राणेंनी केलेला राष्ट्रवादींच्या नेत्यांचा अपमान विसरणं कठीण असल्याची भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. कुठल्याही परिस्थितीत निलेश राणेंचा प्रचार करणार नाही, शरद पवारांनी सांगितलं तरी राणेंच्या प्रचाराला जाणार नाही अशी राष्ट्रवादीचे जिल्ह्याध्यक्ष बाळा भीसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

’11 आणि 13 तारखेला अजित पवार आणि शरद पवार निलेश राणेंसाठी प्रचार सभा घेणार आहेत. त्यानंतर दीपक केसरकरही कामाला लागतील’, असं राणे म्हणाले होते. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. राणेंनी केलेला राष्ट्रवादींच्या नेत्यांचा अपमान विसरणं कठीण असल्याची भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती.

  • tejesh p jadhav

    HYA NIVDNUKIT KOKNI MANUS NARAYAN RANELA KATRAJ GHAT DAKHIVNAR

close