अरुण गवळी दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार

March 27, 2009 11:48 AM0 commentsViews: 147

27 मार्च अखिल भारतीय सेनेचे आमदार अरुण गवळी हे दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार आहेत. तशी घोषणा त्यांची मुलगी गीता गवळी यांनी केली आहे. या घोषणेने अरुण गवळी बसपतर्फे दक्षिण-मध्य मुंबईतून निवडणूक लढवणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.काही दिवसांपूर्वी अरुण गवळींना बसपतर्फे उमेदवारी जाहीर झाली असून ते दक्षिण-मध्य मुंबईतून निवडणूक लढवणार आहेत, अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. मात्र आता गवळींनी अखिल भारतीय सेनेतर्फे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. कारण अरुण गवळी यांनी दक्षिण मुंबईतून मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. त्यांचं काम तिथल्या लोकांना माहीत आहे, अशीही माहिती गीता गवळी यांनी दिली. अरुण गवळींचा पक्ष हा बसपमध्ये विलीन होण्याची चर्चा होती. ' बसपमध्ये अखिल भारतीय सेनेचं विलिनीकरण करून आम्हाला काहीही फायदा नसल्याचं गीता गवळींनी सांगितलं आहे. दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे मोहन रावले, काँग्रेसचे मिलिंद देवरा, मनसेचे बाळा नांदगावकर आणि एबीएन ऍम्ब्रोच्या अध्यक्षा मीना सन्याल यांनीही उमेदवारी भरली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पंचरंगी लढतीचं चित्र दिसू लागलं आहे.

close