मंगळाकडे भारताचे आणखी एक ‘पाऊल पुढे’

April 9, 2014 5:44 PM0 commentsViews: 1006

mars mission09 एप्रिल: भारताच्या महत्त्वाकांक्षी मिशन मार्स मोहीमने आज आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. मिशन मार्स ऑर्बिटरनं आपल्या मंगळ ग्रहाच्या प्रवासातील अर्धा टप्पा पार केला आहे.

आज (बुधवारी) सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी मार्सऑर्बिटरनं आपल्या एकूण 680 दशलक्ष किलोमीटर प्रवासापैकी अतिशय महत्वाचा टप्पा असणारं निम्मं अंतर पार केलंय. इस्रोसाठी हे महत्त्वाचं यश आहे.

यापुढेही सर्व काही योजनेप्रमाणे पार पडल्यास येत्या सप्टेंबरमध्ये ‘मार्स ऑर्बिटर’ मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचणार आहे.

5 नोव्हेंबर 2013 रोजी इस्रोसाठी महत्त्वाकांक्षी मोहीम असणार्‍या मिशन मार्सने यशस्वी प्रक्षेपण केलं. जवळपास वर्षभरानंतर ते मंगळाच्या कक्षेत पोहोचेल. या उपग्रह आणि पीएसएलव्हीवर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मिशन मार्स हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मोहीम आहे.

हे यान मंगळाच्या भोवती एका कक्षेमध्ये फिरेल. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं संशोधन केलं जाणार आहे. प्रक्षेपणानंतर साधारण वर्षभरानंतर हा उपग्रह मंगळाच्या जवळ पोहोचेल. पृथ्वीभोवती फिरणार्‍या उपग्राहंप्रमाणेच हा मंगळाच्या कक्षेभोवती फिरणार आहे आणि त्यानंतर तिथून वेगवेगळे प्रयोग करून ही माहिती इस्त्रोला पाठवणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर भारत मार्स क्लब मध्ये जाणारा चौथा देश ठरेल.

‘मिशन मार्स’ ची उद्दिष्टं

  • - मंगळाच्या भूपृष्ठाचं चित्रीकरण
  • - खनिजांचं मानचित्रण
  • - हवामानाचा सखोल अभ्यास
  • - मिथेनचा शोध
close