प्रचारासाठी कार्यकर्ते पाहिजेत, 1000 रुपयांसह जेवण,पेट्रोल फ्री !

April 9, 2014 6:17 PM2 commentsViews: 5409

sd_25election_campaign_storyउदय जाधव, मुंबई

09 एप्रिल : निवडणूक प्रचारात सध्या सर्वाधिक मागणी आहे ती कार्यकर्त्यांना..दिवसभर प्रचार करण्यासाठी आणि आपल्यामागे मोठ्या संख्येनं समर्थक दाखवण्यासाठी उमेदवार कार्यकर्त्यांना दरदिवशी 500 ते एक हजार रुपयांपासून ते जेवण आणि गाड्यांना पेट्रोलही पुरवत आहेत. त्यामुळे मतदार राजाच्याआधी कार्यकर्त्यांना खुश ठेवण्याची कसरत उमेदवारांना करावी लागत आहेत.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहचलाय. सर्वच उमेदवार आपण किती प्रबळ दावेदार आहोत हे दाखवण्यासाठी प्रचारात कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी करावी लागतेय आणि यासाठी उमेदवार भाडोत्री कार्यकर्त्यांना पैसे देऊन आणत आहेत.

पाच वर्षातून एकदा येणार्‍या निवडणुकांसाठी उमेदवार आपली सर्व शक्ती पणाला लावत आहेत. भाडोत्री कार्यकर्त्यामुळे उमेदवारांच्या मागे मोठी गर्दी जरुर दिसेल पण हे कार्यकर्ते मतदारांना किती प्रभावित करू शकले हे निकालाच्या दिवशीचं स्पष्ट होईल. भाडोत्री कार्यकर्ते घेण्यात सत्ताधार्‍यांनसोबत विरोधकही आघाडीवर आहेत.

निवडणूक आयोगाचे अधिकारी सगळीकडे फिरत असले. तरी पैसे देऊन आणलेली भाडोत्री गर्दी मात्र कधी पकडली नाहीये. या गर्दीसाठी
दिला जाणारा पैसा कुठून येतो? की तो उमेदवार आपल्या खर्चात दाखवतात का? की तो काळा पैसा असतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही उघड गुपितं आहेत.

  • Mahavir Jain

    bharashatare ne kamawallele paisa asaca udhalatat

  • rahul kurkute

    Bahdkhu lokanach yachi garaj battle yache achary vatte

close