उत्तर मुंबईत तिरंगी लढत, कोण मारणार बाजी ?

April 9, 2014 8:52 PM1 commentViews: 2072

364_mumbai_south_election_sanjay nirupamविवेक कुलकर्णी, मुंबई

08 एप्रिल : मुंबईतल्या सहाही लोकसभा मतदारसंघात यावेळेस चुरशीची निवडणूक आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने मुंबईतल्या सहाही जागी बाजी मारली होती. यावेळेस नेमका काय निकाल लागेल याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. उत्तर मुंबई मतदारसंघात कशा प्रकारे लढत रंगलीय या बद्दलचा हा रिपोर्ट

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात यावेळेस तिरंगी लढत आहे. काँग्रेसतर्फे विद्यमान खासदार संजय निरूपम,भाजपचे गोपाळ शेट्टी आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार सतीश जैन हे प्रमुख उमेदवार आहेत.

  • मालाड पश्चिम – काँग्रेस
  • कांदीवली पूर्व – काँग्रेस
  • चारकोप – भाजप
  • बोरिवली – भाजप
  •  दहीसर – शिवसेना
  • मागठाणे – मनसे

आम आदमी पार्टीतर्फे यावेळी पहिल्यांदाच निवडणूक लढवणार्‍या सतीश जैन यांनी घरोघर जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिलाय. उत्तर मुंबई मतदारसंघात रस्ते, शिक्षण, झोपडपट्टया या सारख्या अनेक समस्या आहेत आणि त्याकडे विद्यमान खासदाराच अजिबात लक्ष नसल्याच जैन यांच म्हणणंय.

भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी हे घरोघरी जाऊन प्रचार करतायत तसंच भाजपात लोकप्रिय असलेल्या रथयात्रेद्वारेही ते मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. निरूपम यांनी गेल्या पाच वर्षात लोकसभेची काम केली नाहीत आणि यंदा मोदी लाट असल्यामुळे आपला विजय नक्की असल्याचा विश्वास शेट्टी व्यक्त करत आहे.

काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय निरूपम यांनी पदयात्रा आणि चौक साभा याद्वारे आपला प्रचार सुरू ठेवलाय. खासदार म्हणून मी माझी काम केलीच पण माझ्या मतदारसंघातली मुंबई महानगरपालिकेनं कारायची रस्ते,ड्रेनेज,प्रसाधानगृह याची कामदेखील केली असल्याचा दावा निरूपम करत आहेत.

एकंदरीतच उत्तर मुंबई मतदारसंघातली निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित.

  • umesh jamsandekar

    ह्या वेळेला संजय निरुपम यांना कोण वाचवणार, गेल्या वेळेस मनसे धावून आली होती मदतीला. आता आप आली आहे ताप द्यायला.

close