उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यावर गुन्हा दाखल

March 27, 2009 3:59 PM0 commentsViews: 5

27 मार्च, मुंबई पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह उद्गार काढल्याप्रकरणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरूद्ध आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत 20 मार्चला शिवसेना-भाजप युतीच्या मेळाव्यात केलेल्या भाषणाबद्दल या दोघांवर काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे आणि गडकरी यांच्या आक्षेपार्ह विधानांमुळे आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला आहे, असा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला होता. या अहवालांवरून दोघांविरूद्ध जामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे दोघांना जामीन मिळू शकतो.

close