विदर्भात आज दहा जागांसाठी मतदान

April 10, 2014 7:06 AM0 commentsViews: 1703

sc-asks-ec-to-install-electronic-voting-machines-issuing-paper-receipts-to-voters-for-2014-polls_081013010529प्रवीण मुधोळकर, नागपूर

१० एप्रिल : लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील मतदानाच्या टप्प्यांना विदर्भात सुरवात होणार आहे. मंगळवारी संध्याकाळी प्रचार संपला असला तरी विविध राजकीय पक्षांचा आता छुपा प्रचार सुरूच आहे. मतदानात कुठलाही अडथळा येवू नये यासाठी निवडणूक आयोगाने संपुर्ण तयारी केली आहे.

आज  विदर्भात होणार्‍या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली. विदर्भात एकूण दहा जागांसाठी एकूण 201 उमेदवार रिंगणात आहे. त्यातही नागपूरमध्ये विलास मुत्तेमवार, नितिन गडकरी आणि अंजली दमानिया, तर अमरावतीत आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यातली लढत चर्चेत आहे.

यवतमाळ वाशिममध्ये शिजाीराव मोघे आणि विद्यमान खासदार भावना गवळी एकमेकांसमोर उभे ठाकलेत. विदर्भात आज एकूण एक कोटी 64 लाख 47 हजार 131 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. एकूण 19 हजार 893 मतदान केंद्रांवर मतदान होईल तर 673 मतदान केंद्र संवेदनशील आणि 243 केंद्र अतीसंवेदनशील म्हणून जाहीर झाली आहेत.

पंधराव्या लोकसभा निवडणुकीची सुरुवात… महाराष्ट्रामध्ये विदर्भापासून होतेय. पण गोंदियामध्ये काही ईव्हीएम मशीन्समध्ये सोमवारी दोष आढळले होते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सर्व विधानसभा क्षेत्रातील ईव्हीएमच्या फेरतपासणीचे आदेश दिले आहेत. पण विदर्भातील सर्व ईव्हीएमची पुर्नतपासणी करण्याचे मागणी भाजपने केली आहे.

गेल्या पंधरा दिवसात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्टार प्रचारकांनी धुराळा उडवला आहे. आता छुप्या प्रचाराकडे आणि मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रकाराकडे निवडणूक आयोगाची नजर आहे. मतदानात कुठलाही अडथळा येवू नये यासाठी निवडणूक आयोगाने संपुर्ण तयारी केली आहे.

विदर्भात 19 हजारांवर मतदान केंद्र आहेत. यातले 673 संवेदनशील तर 243 केंद्र अतिसंवेदनशील आहेत. पोलिसांनी बंदोबस्तासाठी अतिरिक्त कुमक मागवली आहे. लोकसभेच्या 10 जागांसाठी एकूण 201 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 1.65 कोटी मतदार त्यांचं भवितव्य ठरवणार आहेत.

close