सल्ला अंगलट, राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

April 9, 2014 11:04 PM0 commentsViews: 5048

rajthakare_dombivali_09 एप्रिल : “आत्महत्या करू नका, त्यापेक्षा तुमच्यावर अन्याय करणार्‍यांना मारा असा” सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अंगलट आलाय. राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

यवतमाळमध्ये झालेल्या प्रचार सभा घेतली होती. यावेळी बोलताना त्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा मारून मरा, असं आवाहन शेतकर्‍यांना केलं होतं. या वादग्रस्त वक्तव्यावरून हा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या या भाषणाची सीडी तपासून त्याविषयी निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारीच स्पष्ट केलंय. राज यांच्या भाषणाची सीडीही मागवण्यात आली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे संकेत दिल्यानंतर आज दुसर्‍या दिवशी राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

close