विदर्भात सरासरी मतदान

April 10, 2014 7:24 PM0 commentsViews: 6353

Image img_198422_electionmahapalical_240x180.jpg10 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात आज (गुरुवारी) मतदान पार पडलं. विदर्भाच्या जनतेनं भरभरून मतदान करून लोकशाहीचं कर्तव्य पार पाडलंय. संपूर्ण विदर्भात सरासरी 62.37 टक्के मतदानाची नोंद झालीय. पण या मतदानाला गडचिरोलीत गालबोट लागलं.

गडचिरोलीमध्ये मतदान पथक आणि पोलिसांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. मतदान पेट्या पळवण्याची त्यांची योजना होती. पण पोलिसांनी त्यांना चोख उत्तर दिलं. मतदान पथकातले सर्व अधिकारी सुरक्षित आहेत.

देशाचे लक्ष्य लागून असलेल्या विदर्भात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालं. एकूण 10 मतदारसंघांसाठी मतदान झालं. विदर्भात सध्या रणरणत ऊन आहे. पारा चाळीशीला पोहोचलाय. त्यामुळे मतदार सकाळीच मतदानासाठी बाहेर पडले आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची नोंद झाली. बुलडाण्यामध्ये 49 टक्के, अकोला 49, अमरावती 51, वर्धा 54, रामटेक 50.08, नागपूर 43.4, भंडारा आणि गोंदिया 71, गडचिरोली-चिमूर 65, चंद्रपूर 58.48, यवतमाळ वाशिम 54.05 टक्के मतदान झालंय.

तर सकाळीच भाजपचे उमेदवारी नितीन गडकरी यांनी सहकुटुंब, टाऊन हॉल या मतदान केंद्रावर जावून मतदान केलं. तर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे रामटेकचे उमेदवार मुकुल वासनिक यांनीही मतदान केलंय. दरम्यान, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील अहेरी, आमगाव, आरमोरी आणि गडचिरोली या भागात मतदान दुपारी 3 वाजता संपलं. तिथं 59 % मतदान झालंय. तर ब्रम्हपुरी आणि चिमूर इथं मतदानाची वेळ संध्याकाळपर्यंत 61 टक्के मतदान झालं.

विदर्भात  मतदान

 • नागपूर – 43.4 टक्के
 • रामटेक – 50.8  टक्के
 • अमरावती – 51 टक्के
 • वर्धा – 54  टक्के
 • बुलडाणा – 49 टक्के
 • अकोला – 49 टक्के
 • यवतमाळ – 54.05 टक्के
 • भंडारा-गोंदिया  – 71 टक्के
 • चंद्रपूर  – 58.48 टक्के
 • गडचिरोली65 टक्के

2009 लोकसभा निवडणुकीतील मतदान

 • - बुलडाणा – 61.6 टक्के
 • – अकोला – 49 टक्के
 • – अमरावती – 51 टक्के
 • – वर्धा – 54 टक्के
 • – रामटेक – 50.8 टक्के
 • – चंद्रपूर – 58.48 टक्के
 • – गडचिरोली – 65 टक्के
 • – नागपूर – 43.4 टक्के
 • – यवतमाळ – 54.5 टक्के

विदर्भामध्ये 10 जागांसाठी लढत

 • - सर्वसाधारण मतदारसंघ- 7
 • - एससीसाठी राखीव मतदारसंघ- 2
 • - एसटीसाठी राखीव मतदारसंघ- 1
 • - एकूण उमेदवार- 201
 • - पुरुष उमेदवार- 182
 • - महिला उमेदवार – 18
 • - इतर- 1

पक्षाचे उमेदवार

 • भाजप- 6 उमेदवार
 • शिवसेना- 4 उमेदवार
 • राष्ट्रवादी काँग्रेस- 3
 • काँग्रेस- 7 उमेदवार
 • बहुजन समाज पक्ष- 10
 • कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया- 1
 • महाराष्ट्र नवनिर्माण सेना- 1
 • मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी- 2
 • अपक्ष- 95

सर्वात मोठा मतदारसंघ- नागपूर
सर्वात लहान मतदारसंघ- गडचिरोली

इव्हीएम कंट्रोल युनिट- 21,102
बॅलट युनिट- 41,661

मतदान केंद्र- 19184
कर्मचारी – 143880

close