प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला 6 कोटी रुपयांचं मखर

March 28, 2009 7:17 AM0 commentsViews: 170

28 मार्च प्रभादेवी इथं असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या गाभार्‍यामध्ये सोन्याचा मुलामा असलेलं सुमारे 6 कोटी रुपयांचं मखर बसवण्यात आलं आहे. यामध्ये 54 किलो सोनं आणि 20 किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे. ब्रीच कँडी इथल्या जजोडिया कुटुंबानं हा मुकुट अर्पण केला आहे. दोन वर्षांपासून त्यांची ही इच्छा होती. सिद्धीविनायकाचा अनोखा मखर राजेश मिस्त्री यांनी तयार केला आहे. मंदिर व्यवस्थापनाने शुक्रवारी विधीवत सुवर्ण कळसाचं पूजन करून मंदिर भाविकांसाठी खुलं केलं आहे.

close