मुंबईत कारमधून दोन कोटींची रोकड जप्त

April 10, 2014 5:45 PM0 commentsViews: 1764

borivali_car10 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबईत दोन कोटींची रोकड जप्त करण्यात आलीय. बोरिवलीमध्ये एका कारमधून दोन कोटींची रोकड नेली जात होती.

मात्र निवडणूक अधिकार्‍यांच्या कारचा संशय आल्याने त्यांनी कारची तपासणी केली. निवडणुकीसाठी या पैशाचा गैरवापर केला जात असावा अशी शंका निवडणूक अधिकार्‍यांना आहे. बोरिवली पोलीस आणि निवडणूक आयोग घटनेचा पुढील तपास करत आहे. दोन कोटींची रक्कम एखाद्या राजकीय पक्षाकडून निवडणुकीत वापरासाठी आणली असावी असा संशयही व्यक्त केला जात आहे.

बोरिवली पश्चिममध्ये कल्पना चावला चौकाजवळ निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी संशयाच्या आधारावर ईको कारला थांबवले. या कारची तपासणी केली असता कारमध्ये दोन कोटींची रोकड असल्याचं समोरं निदर्शनास आलं. ही कार एटीएमला पैसे पुरवणार्‍या कंपनीची गाडी असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. यानुसार पोलीस आणि निवडणूक अधिकारी अधिक चौकशी करत आहे.

close