‘सोयी नाही तर मतदान नाही’, गावकर्‍यांचा बहिष्कार

April 10, 2014 6:29 PM0 commentsViews: 1087

776buldhana_digrss10 एप्रिल : एकीकडे लोकसभेसाठी मतदान सुरू आहे तर दुसरीकडे मतदारराजाने बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. बुलडाणा, वर्धा,अमरावतीमध्ये गावकर्‍यांनी मतदानावर बहिष्कार घातलाय.

बुलडाणा जिल्ह्यात मोरगाव-दिग्रज गावाने मतदानावर बहिष्कार घातला आहे. रस्ते, वीज अशा मुलभूत सुविधा नसल्यामुळे गावकर्‍यांनी हा बहिष्कार टाकलाय. मोरगाव-डिग्रस हे जवळपास दोन हजार लोकवस्तीच गाव आहे.

गावकर्‍यांना प्रशासनाला अनेक निवदेनं देऊनही काहीही कारवाई झाली नाही, त्यामुळे संतप्त गावकर्‍यांनी बहिष्काराचा निर्णय घेतला. दरम्यान, बुलडाण्यात काही मतदारांनी नोटाचा हक्क बजावल्याची माहिती आहे.

अपंगांचा बहिष्कार

तर नाशिकमध्ये अपंग नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये अपंगांच्या मागण्यांचा उल्लेख नसल्याचा निषेध करत हा बहिष्काराचा निर्णय घेण्यात आलाय. निराधार योजनेच्या मानधनात वाढ व्हावी. गेल्या अनेक वर्षांपासून प्रहार क्रांती या अपंग संघटनेने अनेक मागण्या केल्या आहेत. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे सरकारला ही जाणीव करून देण्यासाठी अपंग नागरिकांनी नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

close