मोदींवर टीका करण्यासाठी काँग्रेसच्या साईटवर अटलबिहारी वाजपेयी!

April 11, 2014 11:25 AM1 commentViews: 1452

congress vajpai11 एप्रिल :  भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरात दंगल प्रकरणी टीका करण्यासाठी कॉंग्रेसने आता माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा आधार घेतला आहे.

गुजरात जातीय दंगलीनंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘राजधर्माचे पालन करायला हवे’ या वक्तव्याची ‘आठवण’ करून देण्यासाठी कॉंग्रेसने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर वाजपेयी यांचे फोटो टाकल्यामुळे आता केले चर्चेला उधाण आलं आहे.  मोदींवर टीका करण्यासाठी वाजपेयींचा फोटो वापरण्यात आला आहे.

‘दंगलीच्या काळात मोदींनी राजधर्माचा पालन न केल्याचे खंत वाजपेयींना होते असे काँग्रेसचे म्हणणे होते. यावरुन भाजपमधील सर्वोच्च नेता ज्या नेत्याला मुख्यमंत्री पदासाठी योग्य समजत नव्हते, त्यांच्या हाती तुम्ही आपलं भविष्य कसं देणार असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. भाजपला वाजपेयींचा विसर पडला असला तरी जनता मात्र या नेत्याला विसरणार नाही असा टोलाही काँग्रेसने लगावला आहे.

  • ulhas andurkar

    this is how congres is playing double game.they r showing lot of love about other party leader but what about their leader have looted ,killed tandukand, kalmadi shila dikshit and many more but nobody wants to talk?this is called hipocracy of congress ,why they want to interfear in others life?why?is it they r very good,what about Dawwod ?what he did everybody knows in sharad pawar wad CM of maharashtra?see the BIHAR BELCHI NARSANHAR and many more.

close