संगीतकार नंदू भेंडे यांचं मुंबईत निधन

April 11, 2014 2:46 PM0 commentsViews: 536

nandu bhende 11 एप्रिल : प्रयोगशील संगीतकार नंदू भेंडे यांचे मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्याने आज सकाळी 10च्या सुमारास निधन झाले. ते 61 वर्षीचे होते.

नंदू भेंडे यांनी भावगीतांच्या काळात लोकांना रॉक गाण्यांची ओळख करुन दिली. आज ठिकठिकाणी मराठी रॉक गाण्यांमध्ये जे बदल होत आहेत त्यात नंदू भेंडे यांचं खूप मोठ योगदान आहे.

 

नंदू भेंडे बँड

  • सॅवेज एन्काउंटर
  • द ब्रीफ एन्काउंटर
  • वेलवेट फॉग

इंग्लिश नाटकांची निर्मिती

  • कॅसानोवा
  • डबल ट्रबल
  • हँकी पँकी
  • राशोमान

सिनेमासाठी पार्श्वगायन

  • डिस्को डान्सर
  • चमत्कार
close