वरूण गांधींना आशिष देशमुखांचा पाठिंबा

March 28, 2009 1:23 PM0 commentsViews: 5

28 मार्चप्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कारवाई झालेल्या वरूण गांधींना काँग्रेसचे नेते रणजीत देशमुख यांचे पुत्र आशिष देशमुख यांनी पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे वरूण गांधींना टार्गेट करणार्‍या काँग्रेसला महाराष्ट्रात धक्का बसलाय.आशिष देशमुख थेट पिलीभीतमध्ये पोहोचले आणि त्यांनी वरूण गांधींंच्या आक्षेपार्ह कृत्याचं जणू समर्थनच केलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या मुद्यावर रणजीत देशमुख यांनी आशिषची ही कृती पक्षविरोधी असल्याचं म्हटलंय. तर आशिष देशमुख यांनी घेतलेल्या भूमिकेवर आता काँग्रेस कारवाई करेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी परभणीतून दिली आहे.

close