‘हॉस्पिटल’ एक्स्प्रेस

April 11, 2014 3:41 PM0 commentsViews: 341

11 एप्रिल :  रेल्वेच्या रूळांवर असंख्य रेल्वेगाड्या आपण दररोज धावताना पाहतो.पण मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर एक अनोखी रेल्वेगाडी सध्या पहायला मिळतेय. रूळांवर धावणारे पहिले हॉस्पिटल असं या रेल्वेचं वर्णन करता येईल. या ‘जीवनरेखा’ एक्स्प्रेसमध्ये छोट्या वैद्यकीय तपासण्यांसोबतच वेळेप्रसंगी तीन रूग्णांवर शस्त्रक्रियाही करता येऊ शकते.

देशातल्या ज्या भागांत वैद्यकीय सुविध पोहोचू शकत नाहीत तिथे या रेल्वेद्वारे गरिबांना मोफत उपचार दिले जातात. ‘इम्पॅक्ट इंडिया फाउन्डेशन’ने भारतीय रेल्वेच्या सहय्याने हि गाडी बनवली आहे.

close