पुण्याच्या मतदारयादीत 1 लाख बोगस नावं -फडणवीस

April 11, 2014 4:59 PM0 commentsViews: 1726

election46_fadnvis11 एप्रिल : अमरावतीत निवडणूक याद्यांमध्ये घोळ समोर आल्यानंतर आता पुण्याच्या मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सांगलीतली 1 लाख 8 हजार नावं पुण्याच्या मतदारयादीत जशीच्या तशी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. नावं सारखी मात्र त्यांचे फोटो वेगळे असल्याचं सांगत त्यांनी या प्रकरणी काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्यावर टीका केलीय.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही नावं गेल्या 6 महिन्यांत मतदार याद्यांमध्ये अंतर्भूत केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून पोलिसांतही तक्रार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

close