‘मान्य का केलं नाही’

April 11, 2014 8:46 PM1 commentViews: 819

11 एप्रिल : लोकसभा निवडणूकांचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना प्रचारात थेट लक्ष केलंय. मोदींनी एवढ्या वर्षांनी प्रतिज्ञापत्रात पत्नीचा उल्लेख केल्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी टीका केलीय. इतक्या निवडणुका लढल्यात तर विवाहित असल्याचं का लपवून ठेवलं. गुजरातमध्ये एक तरुणीचा फोन टॅप करण्यासाठी संपूर्ण गुजरात पोलीस कामाले लागले होते. आणि आता महिलांच्या सुरक्षेबाबत कसं बोलताय. हा कसला आदर्श ? अशी घणाघाती टीका राहुल यांनी केली. जम्मू आणि काश्मीरच्या डोडा इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

  • Amit Shinkar

    Comedy Speeches with Rahul!

close