लाहोरमध्ये पोलीस ट्रेनिंग सेंटरवर हल्ला : 20 ठार, 30 जखमी, 800 पोलीस ओलीस

March 30, 2009 7:59 AM0 commentsViews: 4

30 मार्च, इस्लामाबादलाहोरमध्ये मनावाइथल्या पोलीस ट्रेनिंग सेंटवर सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात 20 जण ठार झालेत तर 30 जण जखमी झाले असूनही फायरिंग सुरू आहे. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 800 पोलिसांना ओलीस ठेवण्यात आल्याचं समजतंय. आतापर्यंत 8 स्फोटांचे आवाज ऐकू आलेत. या दहशतवादी घटनेमुळे लाहोरमध्ये हायअलर्ट घोषीत करण्यात आला आहे. 7 ते 8 दहशतवादी हल्ल्यात सामील असल्याचं समजत आहे. घटनास्थळी आर्मी दाखल झालीये. पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी आणि अंतर्गत सुरक्षा मंत्री रेहमान मलिक यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

close