कसाबची वकिली घेतली अंजली वाघमारेंनी

March 30, 2009 8:25 AM0 commentsViews: 1

30 मार्च, मुंबई 26 नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यातला मुख्य आरोपी अजमल कसाबला वकील मिळाला आहे. आता अंजली वाघमारे या कसाबच्या वकील असतील. लीगल एड पॅनलने कसाबच्या वकिलीसाठी अंजली वाघमारे यांची नियुक्ती केली आहे. मुंबईतल्या स्पेशल कोर्टात वकील मिळावा या मागणीवर निर्णय झाला. त्याच्या खटल्याची पुढची सुनावणी आता 6 एप्रिलला होणार आहे. आपल्याला वकील मिळावा ही कसाबची मागणी होती तसंच तो सरकारी वकील घेण्यासाठीसुद्धा तयार होता.

close