श्रीनिवासन यांची साक्ष देण्यास कोर्टाचा नकार

April 11, 2014 11:49 PM0 commentsViews: 345

sc on shrinivasan11 एप्रिल : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी महेंद्र सिंग धोणी आणि एन श्रीनिवासन यांनी दिलेल्या साक्षीची ऑडिओ टेप बीसीसीआयने सुप्रीम कोर्टाकडे मागितली होती. पण हे रेकॉर्डिंग देण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे.

या संदर्भातला निर्णय आता सुप्रीम कोर्ट 16 एप्रिलला घेणार आहे. धोणी आणि श्रीनिवासन यांच्या रेकॉर्डिंगची प्रत मुदगल समितीकडे आहे. पण त्यांनी ती कोर्टात सादर केलेली नाही.

मुदगल समितीने कोर्टाला फक्त सारांश दिलाय. त्यामुळे हे रेकॉर्डिंग किंवा साक्षीची प्रत बीसीसीआयला देता येणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय.

close