राहुल गांधींनी अमेठीतून भरला उमेदवारी अर्ज

April 12, 2014 3:35 PM0 commentsViews: 272

amethi_rahulgandhi12 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेठीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज भरण्यापूर्वी राहुल गांधींचं अमेठीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही होत्या.

अमेठी मला माझ्या कुटुंबासारखं आहे. गेल्या 10 वर्षांपासून अमेठीत काम करतोय. त्यामुळे इथून मोठा विजय मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी राहुल गांधींचा रोड शो झाला.

अमेठीमध्ये राहुल गांधी यांना भाजपच्या स्मृृती इराणी आणि आम आदमी पक्षाच्या कुमार विश्वास यांचं आव्हान आहे. त्यामुळे इथं तिरंगी लढत असेल. 2004 आणि 2009 च्या निवडणुकांमध्ये राहुल गांधी मोठ्या फरकाने याच मतदार संघातून निवडून आलेले होते. अमेठीत 7 मे रोजी मतदान होणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close