‘बारू बॉम्ब’, मनमोहन सिंग नव्हे,सोनियाच सुपर पंतप्रधान ?

April 12, 2014 4:12 PM0 commentsViews: 1779

677sanajy baru_book_pm_soniyagandhi12 एप्रिल : मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानकाळात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी सुपर पंतप्रधानांची भूमिका बजावली असा गौप्यस्फोट पंतप्रधान कार्यालयाचे माजी प्रसिद्धी सल्लागार संजय बारू यांनी केलाय. ‘द अक्सिडेंटल प्रायमिनिस्टर’ या पुस्तकात त्यांनी हे विधान केलंय.

पंतप्रधान चहूबाजूनं टीकेचं लक्ष्य होत असातानाच्या काळातल्या घटनाक्रमांची नोंदही या पुस्तकात आहे. तसंच या पुस्तकात बारूंनी दावा केलाय की पंतप्रधान, सोनिया गांधी आणि घटकपक्षांच्या दबावाला बळी पडले. मनमोहन सिंग हे एक कमजोर प्रधानमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळावर ताबा नव्हता. मंत्र्यांनाही हे माहिती होते की, मनमोहन सिंग हे सोनिया गांधी यांच्यामुळेच पंतप्रधानपदावर विराजमान झाले. पण त्यांच्यावर सोनिया गांधींचा कोणताही दबाव नव्हता असंही या पुस्तकात स्पष्ट करण्यात आलंय.

तसंच मनमोहन सिंग यांना रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर सी. रंगराजन यांना अर्थ मंत्री बनवायचं होतं. पण सोनिया गांधींनी परस्पर निर्णय घेऊन प्रणव मुखर्जी यांना अर्थमंत्री केलं असा खुलासाही यात करण्यात आलाय. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी ए राजा यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय मनमोहन सिंग यांनी घेतला होता पण असं होऊ दिलं नाही असं बारू यांनी नमूद केलं. मात्र पंतप्रधान कार्यालयाने बारू याचा दावा खोडून काढलाय. त्यांनी बारूंवर खोटेपणाचा आणि आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close