नेपिअर टेस्ट ड्रॉ : गंभीर आणि लक्ष्मणच्या सेंच्युरीज

March 30, 2009 9:11 AM0 commentsViews: 1

30 मार्च, नेपिअरदुसर्‍या इनिंगमध्ये न्यूझीलंडबरोबर खेळताना गौतम गंभीर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी केलेल्या जीगरबाज सेंच्युरीमुळे नेपिअर टेस्ट ड्रॉ करण्यात भारतीय टीम यशस्वी झालीय. टेस्टच्या पाचव्या दिवशी भारताचे चार विकेटवर 476 रन्स झाले असताना खेळ थांबवण्याचा निर्णय दोन्ही टीमनी घेतला. त्यापूर्वी आज सकाळी भारतीय टीमची सुरुवात खराब झाली. चौथ्या दिवसाच्या स्कोअरमध्ये फक्त 8 रन्सची भर घातल्यावर सचिन तेंडुलकर आऊट झाला. ख्रिस मार्टिनने त्याची विकेट घेतली. त्यानंतर गंभीर आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांनी संयमी बॅटिंग करत 96 रन्सची पार्टनरशिप केली. गंभीरने 642 मिनिटांची मॅरेथॉन खेळी करत 137 रन्स केले. जितन पटेलच्या बॉलवर तो एलबीडब्ल्यू आऊट झाला. दुसर्‍या सेशनमध्ये पराभवाचं संकट टळल्यावर लक्ष्मण आणि युवराज यांनी मनमोकळी फटकेबाजी केली. लक्ष्मणने आपली चौदावी टेस्ट सेंच्युरी आज ठोकली. पहिल्या इनिंगमध्ये डबल सेंच्युरी करणार्‍या जेसी रायडरला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

close