अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार प्रचारात

April 12, 2014 9:00 PM0 commentsViews: 4437

12 एप्रिल : महाराष्ट्राच्या राजकारणात पवार आणि ठाकरे घराण्यातील तिसरी पिढीही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलीय. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. तर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार प्रचार सभेत उतरले आहे. पार्थ पवार यांनी तुळजापुरात आघाडीचे उमेदवार डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यासाठी पदयात्रा काढली. पाटील कुटुंब पवार कुटुंब यांचे संबंध सर्वश्रूत आहे. पद्मसिंह पाटलांच्या प्रचारसभेसाठी खुद्ध शरद पवार जातीने लक्ष्य घालून आहे. शरद पवारांनी उस्मानाबादेत चार सभा घेतल्यात. तर सुप्रिया सुळे, अजित पवार यांनीही उस्मानाबादेत सभा घेतल्यात.एवढंच नाही तर शरद पवार स्वत: चार दिवस उस्मानाबादेत हजर होते. यावेळी पार्थ पवार यांनीही प्रचार रॅलीत सहभागी होऊन हजेरी लावली. या प्रचार रॅलीमुळेमुळे येत्या काळात पार्थ पवारही हळूहळू राजकारणात सक्रिय होत असल्याचे संकेत मिळत आहेत. पार्थसोबत पद्मसिंह पाटलांचे नातू मल्हार पाटीलही प्रचारात सोबत होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close