आसाममध्ये 81 तर गोव्यात 76 टक्के मतदान

April 12, 2014 10:28 PM0 commentsViews: 215

right to vote12 एप्रिल : देशात आज लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात मतदान झालं. आसाममध्ये तीन जागांसाठी, गोव्याच्या दोन जागांसाठी, सिक्कीम आणि त्रिपुराच्या प्रत्येकी एका जागेसाठी मतदान झालं.

गोव्यात 76 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालंय. आसाममध्ये 81 टक्के तर त्रिपुरामध्ये 76 टक्के मतदान झालंय.

गोव्यात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रवी नाईक विरुद्ध 3 वेळा खासदार असलेले श्रीपाद नाईक यांच्यातली लढत चुरशीची आहे. तर आसाममध्ये एकूण 38 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close