दिल्लीत चूक झाली, योगेंद्र यादव यांची कबुली

April 12, 2014 8:31 PM0 commentsViews: 1302

12 एप्रिल : राजकारणातील चुकांना माफी नसते एकदा बोलताना चुकले की, भले भले ही ताक फुंकुन पितात अशीच काहीशी स्थिती आपच्या नेत्यांची झाली आहे. दिल्लीच्या निवडणुकांनतर लढण्याआधी आम्ही थोडे मूर्ख होतो. पणआता आम्ही बरंच काही शिकलो असं आपचे नेते योगेंद्र यादव म्हणाले आहे. सरकार बनविण्याची वेळ आली तर तुम्ही यापुढे कोणाला पाठिंबा देणार का किंवा कुणाचा पाठिंबा घेणार का या प्रश्नांचं उत्तर देणं यादव यांनी टाळलं. ते आज पिपंरी चिंचवडमध्ये होते. तसंच आजपर्यंतच्या निवडणुकामध्ये कधीही जाहिरातबाजीवर एवढा खर्च झाला नसेल तेवढा खर्च मोदी आणि राहुल गांधी करत आहेत. हे देशाच्या लोकशाहीला घातक असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं या प्रकाराकडे गांर्भियाने लक्ष देण्याची गरज असल्याचंही आपचे नेते योगेंद्र यादव म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close