मी स्वत:च उमेदवारी नाकारली – गोविंदाचा खुलासा

March 30, 2009 11:47 AM0 commentsViews: 2

30 मार्च आपण स्वत:च उत्तर मुंबईची उमेदवारी नाकारल्याचा खुलासा खासदार गोविंदानं आज सोमवारी पत्रकार परिषदेत केला आहे. आपल्याला कामाचं मार्केटिंग करता आलं नाही अशी खंतही त्याने या पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. आता अभिनेत्री नगमाला उत्तर मुंबईतून काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उत्तर आणि उत्तर पश्चिम मतदारसंघातले उमेदवार अद्याप घोषित व्हायचे आहेत. यापैकी नगमा आणि गोविंदा उत्तर मुंबईसाठी इच्छुक होते. पण दरम्यान, गोविंदानं आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा नगमाने केला आहे. या जागांवर संजय निरुपम,आणि कृपाशंकरसिंह हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. या सगळ्या इच्छुक उमेदवारांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. येत्या एकदोन दिवसात या दोन्ही मतदासंघांतून काँग्रेसचे उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचे संकेत बैठकीतुन मिळाले. त्यामुळे सगळ्या इच्छुकांनी आता उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत. पण यंदाही उत्तर मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या फिल्मबाजीला सुरुवात झाल्याचं दिसतंय.

close