कल्पना गिरी हत्या प्रकरणी आणखी एकाला अटक

April 13, 2014 11:56 AM0 commentsViews: 1043

kalpanagiri_latur4513 एप्रिल : लातूरच्या कल्पना गिरी हत्या प्रकरणी आणखी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी दोन आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

श्रीरंग ठाकूर असे अटक करण्यात आलेल्या तिसऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याने हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष महेंद्रसिंह चौहान आणि त्याच्यासोबत काँग्रेस सदस्य समीर किल्लारीकर यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होत.

कल्पना गिरी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी होत्या. आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेल्या होत्या. यानंतर चार दिवस त्या बेपत्ता अखेर तुळजापूरच्या नदीत त्यांचा मृतदेह आढळून आला.

कल्पना यांचं अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार झाल्याचा त्यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे. याप्रकरणी आरोपींना अटक झालीय मात्र तपास पुढे सरकत नसल्यामुळे सर्वस्तरातून टीका होत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close