वरुण गांधींना 3 आठवड्यांचा जामीन मंजूर

March 30, 2009 12:27 PM0 commentsViews: 1

30 मार्च, पिलीभीत वरुण गांधींना 3 आठवड्यांचा जामीन मंजूर झाला आहे. पण त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजे रासुका लावल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही. पिलीभीत मतदारसंघातल्या प्रचाररसभेत प्रक्षोभक वक्तव्य करणारे भाजपचे युवा उमेदवार वरुण गांधी त्यांना लावलेल्या रासुका विरोधात अलाहाबाद हायकोर्टात अपील केलं. वरुण गांधी यांना उत्तरप्रदेश सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत म्हणजे रासुकाखाली अटक केली आहे. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य करणं, परवानगी शिवाय पिलीभीतमध्ये येणं आणि कार्यकर्त्यांना भडकवणं या मुद्द्यांवरून वरुण गांधींना रासुका कायदा लावला आहे.

close